
प्रतिनिधि किरण पाठक ,अमळनेर..
अमळनेर : येथील खा.शि.मंडळ संस्थेच्या सेक्रेटरी पदी प्रा.पराग पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल,संचालक योगेश मुंदडे,प्रदीप अग्रवाल,हरी भिका वाणी,डॉ अनिल शिंदे,विनोद पाटील,कल्याण पाटील,माजी सेक्रेटरी तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम, सहसेक्रेटरी धीरज वैष्णव,मुख्याध्यापक प्रतिनिधी बी एस पाटील आदी उपस्थित होते.
प्रा. पराग पाटील यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या सर्व महाविद्यालय, माध्यमिक , प्राथमिक शाळेचे पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे..
Discussion about this post