
उदगीर/कमलाकर मुळे :
सरपंच, ग्रामपंचायत सदस्या समोर लोक खुलेआम जात आहेत. उघड्यावर शौचास पंचायत समिती देवणी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी उदगीर :- देवणी तालुक्यातील हांचनाल गाव 100% हागणदारी मुक्त झाल्याचे सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले,प्रत्येक घरात शौचालय असून ही अर्धे गाव सकाळी गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्या समोरच शौचास आजू बाजूच्या शेतात,रस्त्यावर जात असून एवढेच नाही तर शौचास जातात आणि येतेवेळेस शेतातून जे हाताला लागते ते उचलून घेऊन जात आहेत,या लोकांना ग्रामपंचायत सदस्या सह सरपंचाचा ही पाठिंबा आहे का हा प्रश्न आजू बाजूच्या शेतकऱ्यांना पडत असून,मागील काळात अशा बाहेर रस्त्यावर शेतात शौच करणाऱ्यावर देवणी पंचायत समिती ने पथक नेमून कार्यवाही केली होती. पण मागील 4,5 वर्षा पासून हे पथक गायब असल्याने ह्या लोकांचे फावत असून घरात शौचालय असून ही बाहेर शौचास जाणाऱ्या अशा मूर्ख लोकावर त्वरित कार्यवाही करावी,अशी मागणी करण्यात येत आहे..
Discussion about this post