खेड शिवापूर ता. २4 ( सारथी महाराष्ट्राचा ) खेड शिवापूर येथील युको बँकेत मागासवर्गीय करता शासकीय योजने अंतर्गत येणाऱ्या कर्ज योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करीत नसल्याने आर पी आय कामगार आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्या मुळे युको बँकेने पत्रक जाहीर करून योजना व्यवस्थित राबविण्यात येतील असे सांगितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
धनदांडग्यांना नियमाच्या बाहेर जाऊन कर्ज पुरवठा करणे, तर दुसरीकडे मागासवर्गीय नागरिकांना शासकीय योजने अंतर्गत येणाऱ्या योजनांची योग्य पद्धतीने माहिती न देणे, शेतकऱ्यांच्या कर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून योजनांची पायमल्ली हे जातीयवादी अधिकारी सर्रासपणे करीत असल्याने आर.पि. आय. कामगार आघाडी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी युको बँके विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा सरचिटणीस माननीय दीपकजि रजपूत हे देखील आंदोलनात सहभागी होते .मात्र वेळीच बँकेच्या व्यवस्थापनाने शासकीय आलेल्या योजनांची अंमलबजावणी व माहिती त्वरित सर्वांना देण्यात येईल, त्यामुळे आंदोलन स्थगित करावे असे पत्रक दिल्याने कांबळे यांनी आंदोलन स्थगित केले आहे. यावरून युको बँकेत मागासवर्गीय नागरिकांना दूजाभाव मिळत असल्याचे स्पष्ट होत
Discussion about this post