धाराशिव :- विकास वाघ. निवडणुकीत दिलेल्या एका तरी आश्वासनाची पूर्तता या अर्थसंकल्पात या सरकारने केली का? सरकार फक्त जनतेला फसवत आहे. त्यामुळं हे तर खोटारडे सरकार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.सगळ्यांना लाडकं म्हणत जशी मत मिळवली तस आपल्या शब्दाला हे सरकार जागलेलं नाही. लाडकी बहीणीचे 2100 रुपये केले का? शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणालात आज त्यावर सरकार का बोलत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा सभागृहात बोलताना उद्धव ठाकरे नाही असं म्हणाले तुम्ही ठाकरे नाहीत म्हणूनच तुमच्यात शेतकऱ्यांप्रति प्रेम नाही. याच ठाकरेनी पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवल. त्याला वाघाचं काळीज लागत असा टोला खासदार राजेनिंबाळकर यांनी लगावला.
गेल्या अडीच वर्षांपासून या सरकारने जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा प्रकल्पास पुरेसा निधी दिला असता तर हा प्रकल्प पूर्ण झाला असता मात्र अद्यापही याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. वैद्यकीय महाविद्यालया बाबत पण असाच प्रकार होत आहे चार वर्ष होऊनही महाविद्यालयास निधी नाही त्यामुळं बांधकामही नाही. आताही याकडे लक्ष दिलेलं नाही. उद्योगाच धोरण ठरत पण आमच्या जिल्ह्यात त्याचा काहीच उपयोग होत नाही, आताही कोणताही नवीन प्रयत्न या सरकारने इथला उद्योग वाढविण्यासाठी केलेला नाही. असा सर्व बाबतीत जिल्ह्यावर, मराठवाड्यावर व राज्यावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प असल्याच मत खासदार राजेनिंबाळकर यांनी केला आहे.
Discussion about this post