

सोयगाव :
शतकापूर्वी न्यूयॉर्क शहरामध्ये वस्त्रउद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूट गर्ल्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. त्याचे फलित म्हणून कोपनहेगन येथे झालेल्या परिषदेमध्ये ठराव पास करण्यात आला.आणि ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. हा दिवस म्हणजे संघटित नारीशक्तीचा विजय आहे. असे उद्गार मराठी भाषा अभ्यासक व निवेदक प्रा ज्योती स्वामी यांनी काढले.
त्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार व मराठी विभागप्रमुख डॉ दिलीप बिरुटे उपस्थित होते.
प्रा स्वामी यांनी स्त्रियांना राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा सर्व बाजूंनी पिळवणीकीला सामोरे जावे लागते. स्त्री-पुरुष समानतेचे आम्ही पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात यायला बराच अवधी लागणार आहे. याची आम्हाला जाणीव आहे. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी डॉ.संतोष तांदळे, डॉ.साईराज तडवी, डॉ. विक्रम भुतेकर, डॉ. उल्हास पाटील, प्रा. रवींद्र जाधव, डॉ.एस.एल. पाटील, प्रा. मानकर, डॉ. गणेश मिसाळ, प्रा.कल्याणकर आदी प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पंकज गावित यांनी तर सूत्रसंचालन डॉ. निलेश गावडे यांनी केले. शेवटी आभार डॉ.प्रदीप गोल्हार यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंमसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post