
— कृपया प्रसिद्धीसाठी —
कळंब – व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आयोजित श्री.छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक व भाई उद्धवराव पाटील,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिवच्या वतीने घेतलेल्या क्रीडा महाकुंभ क्रिकेट स्पर्धेत खाजगी आयटीआय गटातून धाराशिव जिल्ह्यात धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे संस्थेच्या संघाची निवड नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे.
या विजयाबद्दल दि.८ मार्च २०२५ रोजी वेद शैक्षणिक संकुलात विजयी खेळाडूंचा सत्कार करून विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार, प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,क्रीडा शिक्षक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड आदींची उपस्थिती होती..
Discussion about this post