
निलेश सोनोने.
ग्रामीण प्रतिनिधी पातुर.
पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत जरंडी परिसरात शंभर ते दीडशे हद्दपिलर च्या बांधकामात काँग्रेस ऐवजी मोठमोठे दगडाचा वापर करून लाखो रुपये देयक खडकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसंग्राम चे जिल्हाध्यक्ष दिलीप. पर नाटे.यांनी ७ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतील केला आहे.हद्दपिलर चे बांधकाम करून वन विभागाच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला परंतु हद्दपिल्लरच्या बांधकामात काँक्रीट करण करणे अपेक्षित असताना संबंधित अधिकारी व कन्ट्रकदार यांच्या मिली भक्तामुळे मोठमोठे दगडाचा वापर करून लाखो रुपये चे देयक हडपण्याचा प्रयत्न करून शासनाला गड.लावण्याचा प्रकार तक्रारीतून समोर आला आहे. हद्दपिलर चे बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू असून ध्येय काढण्याच्या प्रयत्न केला जात आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या सक्षम व्हिडिओ चौकशी करण्याची मागणी तक्रारी द्वारे करण्यात आली आहे.या धक्कादाय प्रकरणाची चौकशी केल्याशिवाय देयक काढू नये असा इशारा देण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी होती की प्रकरण दडपल्या जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. या चौकशीकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.
चौकशी न झाल्यास आमरण उपोषण :
झरंडी .परिसरात 100 ते 150 हद्दपिल्लरच्या बांधकामात काँक्रीट करण न करता दगड वापरण्याच्या प्रकरणावरून लीपापोती करून लाखो रुपयाचे ध्येय फडकण्याचा प्रकार होत आहे. संबंधितांनी चौकशी केल्याशिवाय देयक काढल्यास वन विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्यात येईल. लोकशाहीच्या मार्गाने
दिलीप परनाटे.
जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम.
त्या संदर्भात माझ्यापर्यंत तक्रार आली नाही तक्रार प्राप्त झाल्या चौकशी करण्यात येईल दोषी आढळल्यास निश्चितपणे नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
डॉ कुमार स्वामी.
उपवन रक्षक अधिकारी अकोला..
दुर्लक्षित कारभारामुळे लाखो रुपयाची उधळपट्टी :
जझरंडी. परिसर हे अति दुर्गम भागात असल्याने संबंधित वरिष्ठ अधिकारी अद्यापही फिरकत नसल्याने व दुर्लक्षित कारभारामुळे कंटाळ मनमानी पद्धतीने जंगल हद्द दर्शविल्या स्तंभाचे बांधकाम काँक्रीट करण ऐवजी दगडाचा वापर करून लाखो रुपयाचे देयक हडपण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे..
Discussion about this post