
शिरदवाड मध्ये जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीची बैठक संपन्न…!
दिनांक ०९/०३/२०२५ इ रोजी जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीची बैठक लिंगायत समाज भवन शिरदवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथे नुकतीच बैठक पार पडली आजच्या बैठकीचे अध्यक्ष पदी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रतापराव तराळ साहेब व आजच्या बैठकीचे प्रमुख कोल्हापूर जिल्हा उत्तर कार्याध्यक्ष महादेवराव कुंभार यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये महाराष्ट्रात बैठक संपन्न झाली. याच ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांचे निवड प्रक्रिया पार पाडले यामध्ये खालील प्रमाणे निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले १) श्री प्रभाकर गोविंद कुरणे यांची कोल्हापूर जिल्हा उत्तर सचिव पदी निवड करण्यात आले २) विश्वास धर्मा फरांडे कोल्हापूर जिल्हा उत्तर यांची सह सचिव पदीं निवड करण्यात आली ३) रोहित बाळासो पाटील यांचे पेटवडगाव शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली वरील सर्व प्रमुख कार्यकारणी निवडी चे प्रमाणपत्र मा. प्रतापराव तराळ व जिल्हा कार्याध्यक्ष श्री महादेवराव कुंभार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित श्री प्रतापराव तराळ. महादेवराव कुंभार. बाबासाहेब तराळ. भाऊसो मगदूम. विश्वास फरांडे. सौ. गीतांजली वाघे. सौ. गीता ताई कांबळे. रोहित पाटील. सौ सानिका कांबळे. सौ. सरिता सचिन पाटील. सौ. प्रज्वल मारुती वाघमारे, अक्षय कांबळे, प्रकाश वाघमारे, सुरज वाघे, प्रभाकर कुरणे, रोहित पाटील व इतर पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गीतांजली वाघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संघटना वाढीसाठी सर्वांनी मिळून काम करूया असे आपले विचार मांडले तसेच गीता ताई कांबळे यांनी आपले संघटना विषयी विचार मांडले व महिलांनी जास्तीत जास्त संघटनेमध्ये सामील होणे विषयी मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्ष नीय भाषण संघटने विषयी ध्येयधोरणे व संघटनेचे कार्य संघटना कशा पद्धतीने वाढीसाठी व जनतेच्या हितासंबंधी आपली संघटना कशा पद्धतीने काम करते मग शेतकरी असो शेतमजूर असो कष्टकरी असो कामगार असो महिला असो या सर्व विषयावर आपले मार्गदर्शनपर भाषण केले व सर्वांना मार्गदर्शन केले शेवटी महादेव कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले.
Discussion about this post