यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रजत चांदेकर

दिनांक ८ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायत सभागृह वरुड ता. हिंगणघाट येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका फरकाडे यांनी केले त्याच स्पेक्ट्रम फौंडेशनची भूमिका व कार्य, बेटर कॉटनची ओळख व आजच्या दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले, त्यात महिलांचा समान सहभाग, समान वेतन,LMRS या विविध विषयांवर थोडक्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर वर्षा हटकर ( मास्टर ट्रेनर ) यांच्या अंतर्गत महिलांची भूमिका, घरातील असलेली स्थान व त्यांना समोर येण्याकरिता काय काय करू शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व त्यानंतर संगीता बडे समाजसेविका यांच्या अंतर्गत लिंग म्हणजे काय, त्याला समाजामध्ये कशी ओळख दिली जाते त्याच्या कामाचे स्वरूप, विधवा स्त्रियांसोबत वागण्याची पद्धत अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस पाटील सचिन शिरसागर यांनी आपले मनोगत स्पष्ट केले. या कार्यक्रमानंतर संगीत खुर्ची बलून बॉल्स गेम यासारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले व विजयी स्पर्धकांना पारितोषिक देऊन कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहल ढाले यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच उपस्थित सर्व महिलांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दुर्गा तळवेकर, उपाध्यक्ष सचिन सिरसागर प्रमुख वक्ते वर्षा हटवार, संगीता बडे पियू व्यवस्थापक रेणुका फरकाडे, फिल्ड फॅसिलिटर शीतल बोरकर, अजय मांडवकर, हर्षल साटोने, स्नेहल ढाले, CRP कोकिळा सटोने, लेखापाल पपीता चतुरकर, कृषी सखी मनीषा कोहचाटे उपस्थित होते.
Discussion about this post