




आमच्या वार्ताहराकडून
मोहिली. मंगळवार दि 11 मार्च 2025 रोजी माननीय श्री. शेखर मुदडा साहेब यांनी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट मोहिली - अघई , ता. शहापूर या ठिकाणी गोशाळा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान श्री. सुनील सूर्यवंशी साहेब सभासद महाराष्ट्र गोसेवा आयोग, श्री. परेश भाई शहा सदस्य महाराष्ट्र गोसेवा आयोग, डॉक्टर प्रशांत कांबळे साहेब पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य कोकण विभाग आयुक्त, डॉक्टर वल्लभ जोशी जिल्हा आयुक्त महाराष्ट्र पशुवर्धन विभाग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात आलेल्या मान्यवरांचे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे स्थानिक समिती सदस्य श्री. आनंदजी गायकवाड साहेब, श्री. प्रवीण तात्या मोरेसाहेब, सामान्य प्रशासन व्यवस्थापक श्री. उल्हास पाटील यांनी संत प्रसाद देऊन मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी गोशाळा व बायोगॅस प्रकल्प पाहणी केली. ही पाहणी करून संबंधित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
Discussion about this post