
कळब तालुका प्रतिनिधी :- विरेंद्र चव्हाण
मनिषा काटे(भोसले) उपसरपंच गट ग्रामपंचायत मावळणी यांच्या पुढाकाराने
महिला उद्योजक करिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन माटे लॉन कळंब येथे करण्यात आले होते..
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक नागपूर येथील डॉ.विजय शिरसाट सर(जॉईंट डायरेक्टर MSME DPO), सुभाष इंगेवार सर(एस्सीटंट डायरेक्टर MSME) , मनिष खैरकार सर(मार्गदर्शक), स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यवतमाळ चे रोहित मडावी हे लाभले तर प्रमुख
उपस्थिती अशोक उमरतकर, सुधाकर निखाडे, लक्ष्मण ढाले, प्रीतिताई कांबळे, शुभांगी चांदोरे, तेजश्री चांदूरकर ,अजयराव गावंडे, अमोलभाऊ डोबळे होते…
महिलांना व्यवसाया करिता लागणारे आर्थिक पाठबळ कसे मिळवता येईल ?
बँक संबधित माहिती, प्रस्ताव कुटे करायचा आदी माहिती देण्यात आली..
उद्यम आधार असलेल्या महिलांना व्यवसाया करिता कोणत्या संधी उपलब्ध होतील यांची सुद्धा माहिती देण्यात आली..यावेळी दिपाली अमझरे, वंदना तुरणकर, अर्चना हांडे, आशाताई नेहारे, रुपाली मांडरे, नरेश दिगंबर, आकाश काटे, अनिकेत गायकवाड,रेखा काटे,सतीश पारिसे,सविता कोरडे,ज्योत्ती करलुके,मोहिनी पोतदार, रेखा इरपाते,अलका धोपटे , सुमन ढाले, आकांशा काटे, सुशीला बारदमवार,प्रियंका वाघ, दुर्गा काळे, स्वाती दवणे, वैशाली दिगंबर,अनिता जैस्वाल, शिवल रुबारेल, अर्चना वानखेडे व इतर उद्योजक महिला उपस्थित होत्या…
Discussion about this post