
(दारफळ प्रतिनिधी) 12/3/2025 ध्येय प्रकाशन पाचगणी आयोजित राज्यस्तरीय आय एम विनर या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश मंदिर मोहोळ या शाळेत इयत्ता पहिली मध्ये शिकणारी निनाद गोडगे निनाद गोडगे पुणे विभागात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
५ जानेवारी रोजी झालेल्या या परीक्षेत जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या निनादने उत्तुंग यश मिळविले आहे. पुणे विभागात दुसरा येण्याचा मान तिने मिळवला आहे. १५० गुणांच्या या परीक्षेत तिला १३४ गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत नाईक, मुख्याध्यापक खाजप्पा कोरे, शिक्षक सत्यवान खंदारे, रेखा बनकर, अनुपमा क्षीरसागर यांनी शाळेत तिचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशामागे तिच्या वर्गशिक्षिका ज्योती डोंगरे, पालक रोहिणी गोडगे व महेश गोडगे आदींनी तिला मार्गदर्शन केले होते..
सारथी महाराष्ट्राचा दारफळ प्रतिनिधी अशोक शिंदे मो. 9766976263
Discussion about this post