
दारफळ प्रतिनिधी,
दिनांक ११.०३.२०२५
महाराज ग्रुप दारफळ (सिना) ता माढा यांच्या वतीने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी असलेले आंदोलक मा श्री करण इंद्रजित कुटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.
छत्रपती संभाजीराजे बलिदान मासा निमित्त !! छावा !! चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी शिवरायांचा छोटा मावळा कु संग्राम नितीन उबाळे यांने शिवगर्जना करून जनतेची मन जिंकली.
यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व बालगोपाल मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
अरे हजार असतील धर्म,
लाख असतील जाती,
सर्वांना एकत्र गुंफणारा,
एकच राजा शिवछत्रपती….
दारफळ प्रतिनिधी
अशोक शिंदे
मो नंबर +91 97669 76263
Discussion about this post