
प्रा दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी)
देऊळगावराजा शहरात 1997 पासून अखंडितपणे जायंट्स परिवाराचे वतीने होळी उत्सव सना निमित्ताने दरवर्षी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे याही वर्षी दिनांक 14 मार्च 25 गुरुवारी जायंटस परिवाराचे वतीने होळी सणानिमित्ताने मुंबई येथील प्रसिद्ध कवी वीसूभाऊ बापट यांचे “कुटुंब रंगलय काव्यात” चे सादरीकरण ठेवण्यात आलेले आहे विसुभाऊ बापट यांनी आतापर्यंत दहा हजाराहून अधिक कविता, 2700 पेक्षा अधिक प्रयोग, ७० पेक्षा जास्त काव्यप्रकार, दहापेक्षा जास्त मराठी बोलीभाषा, 45 तासांचे पाठांतर तमाम कविता प्रकारांचा काव्य गीत गायन आणि साभीनय सादरीकरणात नटलेला विश्वविक्रमी जागतिक एकपात्री काव्यनाट्यानुभव “कुटुंब रंगलय काव्यात”चे बहारदार सादरीकरण ठेवण्यात आलेले आहे या कवी संमेलनाचा शहरातील रसिकांनी आनंद घेण्याचे आव्हान जायंटस परिवाराचे वतीने करण्यात आलेले आहे,
Discussion about this post