
विशेष म्हणजे गावासाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळून मुरूम उपसा दिवसरात्र चालू असून. पाण्याच्या टाकी शेजारी 30 ते 40 फुटाचे मोठमोठे खड्डे पडले आहे.या मुरूम उपसामुळे पाण्याची टाकी धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. तसेच तडेगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळु उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हजारो ब्रास चे ठिय्या मारून वाळू चोरी केली जात आहे. तरी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन. वाळू व मुरूम चोरीची करणाऱ्या ट्रॅक्टर जेसीबी जप्त करावे नसता सामाजिक कार्यकत्याच्या वतीने तडेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते म्हणून. शरद साळवे प्रभाकर गोपने विष्णू गोफणे यांच्या वतीने जिल्हा अधिकारी जालना यांना निवेदन देण्यात येणार आहे.ग्रामपंचायत कार्यालयावर अमरण उपोषण करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी…
Discussion about this post