संजय फलके,शिरूर तालुका प्रतिनिधी
शिरूर (जि.पुणे) येथील आर. एम. धारीवाल शाळेत दि. २४ ऑगस्ट हा दिवस संस्कृत दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. संस्कृत भाषेचा विकास आणि प्रसारास चालना मिळावी म्हणून संस्कृत शिक्षिका सायली पटवर्धन यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला ९वीच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली. १० वीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेची महत्व सांगणारी भाषणे दिली. ८वी च्या विद्यार्थिनींनी संस्कृत कविता सादर केल्या. नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी नाट्यवाचन सादर केले. पर्यवेक्षिका अपर्णा वाळसे यांनी संस्कृत भाषेचे महत्व सांगितले. प्राचार्या सौ. आश्विनी घारू यांनी संस्कृत दिनाचे महत्व सांगून विद्यार्थी व शिक्षकवृदांचे कौतुक केले.
शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, सदस्य धरमचंदजी फुलफगर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून संस्कृत दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post