“सोनापूर जि. प.प्राथमिक शाळेत नोटबुक,पेन चे वाटप..”
श्रीधर सोनुले शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष याने वाढदिवसा निमित्य जपली सामाजिक बांधिलकी सावली तालुक्यातील सोनापूर येथील श्रीधर सोनुले शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष सामाजिक बांधिलकी जपतआपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना बूक, पेन वितरण करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

तसेच शाळेच्या आवारातील स्वच्छता केली हा स्तुत्य उपक्रम श्रीधर सोनुले यांनी राबविला.

यावेळी शाळेचे शिक्षक तसेच ग्राम कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष डोमाजी शेंडे दिनकर वाघाडे सेवा सहकारी सोसायटी चे उपाअध्यक्ष पंकज रणदिवे, गोपीचंद सोनुले संजय कमलापुरवार, प्रफुल राऊत राकेश मेश्राम कैलास वाघाडे तसेच युवा सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post