रिठद येथे चिमुकल्याचा ‘ग्रीन डे ‘ रिठद :जिजाऊ इंग्लिश स्कूल, रिठाद येथे 27 जुलै रोजी ‘ग्रीन डे ‘ साजरा केला यावेळी शाळेच्या शिक्षिका व शिक्षक व विध्यार्थीनी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. शाळेच्या अनोख्या पद्धतिने वृक्षारोपण करणे आणि चिमुकल्याना वृक्षारोपण करणे आणि चिमुकल्याना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी ‘ग्रीन डे ‘चे आयोजन केले होते यावेळी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याबाबत शपथ घेण्यात आली. त्यावेळी शाळेच्या संचालिका वर्षा बोरकर मॅडम व अध्यक्ष सुभाषराव बोरकर सर यांच्यासह शाळेचे मुख्यध्यापक व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी इत्यादी उपस्तित होते.
Discussion about this post