• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुखेड येथे एसएफआयचे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न

admin by admin
February 20, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

नांदेड (ता. २८) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) चे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन बुधवार, दि. २८ मे रोजी मुखेड येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनाची सुरुवात क्रांतिकारक भगतसिंग यांना अभिवादन करून करण्यात आली.

अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते व डीवायएफआय चे पदाधिकारी अंकुश माचेवाड यांच्या हस्ते झाले. एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी अधिवेशनाला मार्गदर्शन केले, तर शेतमजूर युनियनचे नेते कॉ. विनोद गोविंदवार यांनी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विजय लोहबंदे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रफुल्ल कऊडकर यांनी केले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

अहवाल सादरीकरण व ठराव मंजूर

प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक व शैक्षणिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणारा अहवाल सादर करण्यात आला. त्याआधी शोक ठराव मांडून दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

अधिवेशनात विविध महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्द करण्याची मागणी, सर्व विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास निशुल्क करण्याची मागणी, शासकीय आयटीआयचे खाजगीकरण थांबविणे, जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी लढा तीव्र करणे तसेच विद्यार्थिनी व महिला अत्याचारांविरोधात लढा तीव्र करण्याचे ठराव समाविष्ट होते.

नवीन जिल्हा कमिटीची निवड

अधिवेशनात १८ सदस्यीय नवीन जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी विजय लोहबंदे तर जिल्हा सचिवपदी मीना आरसे यांची एकमताने निवड झाली.

जिल्हा उपाध्यक्षपदी प्रफुल्ल कऊडकर व स्वप्नील बुक्तरे यांची, तर जिल्हा सहसचिवपदी पवन जगडमवार व विकास गायकवाड यांची निवड करण्यात आली. जिल्हा कमिटी सदस्य म्हणून अक्षय सागरे, साहेबराव सोनसाळे, नितीन सोनकांबळे, अमोल गायकवाड, सोनल पाईकराव, नेहा कऊडकर, भारत पवार, शरद खंदारे व भीमराव सोनकांबळे यांची निवड झाली असून तीन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

८६ प्रतिनिधींची उपस्थिती

अधिवेशनात जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून एकूण ८६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व सचिव यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुक्यातील एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

आज दिनांक 3/1/2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अश्वि बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य दर्शनाताई संतोष ताजणे यांच्या वतीने माळीवाडा अंगणवाडी च्या मुला-मुलींना शूज वाटप करण्यात आले शूज वाटप करताना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच बबनराव शिंदे सदस्य अजहर भाई शेख,अभिजीत ताजने, बाळासाहेब मदने, अवि गायकवाड, अनिल कंगनकर, भाऊसाहेब खेमनर, जय श्री केदारी अरुणाताई हिंगे,परीघा बाई गायकवाड, समाजसेवक संतोष ताजने जात्रकमिती अध्यक्ष बाळासाहेब जराड, उपाध्यक्ष दाऊद भाई शेख, किशोर पाटील मच्छू होटघर प्रीतम गांधी उपस्थित होते.

Next Post

947046621750898675

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
53
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
32
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
78
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

947046621750898675

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In