वार्ताहर प्रशांत माने हिवरे तर्फे नारायणगाव :-गेली अनेक दिवस शिवहरीनगर हिवरे तर्फे नारायणगाव येथील नागरिकांची ईच्छा होती की, शिवहरीश्वर मंदिराला छान सांस्कृतिक सभामंडप असावा. तर ग्रामस्थांची ईच्छा आता पूर्णत्वास जाणार आहे. मा.सौ आशाताई बुचके जिल्हा परिषद सदस्य पुणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधीतून सभामंडप मंजूर होऊन त्यांचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी हिवरे तर्फे नारायणगाव, माळवस्ती, सातपुडा, कोरपडमळा, जमनानगर, भोरमळा, कळमजाई मळा, गणेशनगर देवाची जाळी येथील ग्रामस्थ तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Discussion about this post