नायगांव तालुका प्रतिनिधी….
दिपक गजभारे घुंगराळेकर….
कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे अंतरगाव येथील गावातील लाईनमन हे आपले कर्तव्य बजावत असताना गावातीलच एक नागरिक यांनी सदर लाईनमन वीज वसुलीसाठी गेले असता कालर पकडून धक्काबुकी करून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केले असे गुन्हे लावत सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
रवी कुमार शंकरराव मोरे वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण शाखा कुसनूर येथे कार्यरत असून त्यांच्याकडे अंतरगाव आणि इतर दोन गावाचा पदभार आहे येथील विद्युत केंद्र तपासणे वीज बिल वसुली करणे थकबाकीदार ग्राहकाचा विज पुरवठा खंडित करणे अशा इत्यादी कामे सोपविले आहेत. सदर काम करत असताना पाडत असताना दिनांक.30/8/2024 रोजी सकाळी नऊ वाजता च्या सुमारास वीज बिल वसुली करीत असताना श्री.पांडुरंग हौसाजी शिंदे, हे माझ्याजवळ येऊन तू पैसे कशाचे मागतोस जमा करतोस याची पावती कुठे आहे, तुझ्या साहेबाला घेऊन गावात ये असं म्हणत माझ्या कॉलर पकडून माझा हात मुरगाळून मला धक्काबुकी केली, असा जर पुन्हा गावात आला तर तुला बघून घेतो अशी धमकी पण दिली या वरून सदर लाईनमन मोरे यांनी पांडुरंग हौसाजी शिंदे यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करा अशी तक्रार केली आहे, त्यांच्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाणे येथे सदर आरोपी विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे….
सदर भारतीय दंड न्याय संहिता कलम 132 115(2) ,351 (2) 352 अशा शासकीय कामात अडथळा करणे शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणे अशा विविध कलमाखाली अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांच्या मार्फत पवार हे करत आहेत…..
Discussion about this post