क्विक हील फाउंडेशन अँटीव्हायरस कंपनी पुणे येथील कैलास काटकर यांच्यामार्फत सायबर वॉरियर्स ची नियुक्ती करण्यात येते.
धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस या कॉलेज मधील बी.एस.सी कॅम्पुटर शिक्षण घेत असलेल्या रूपाली संजय माळी व अंकिता विजय महाजन या दोन विद्यार्थिनींची या फाउंडेशन तर्फे सायबर वॉरियर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली.आणि यांच्यामार्फत व सायबर वॉरियर्स मार्फत जिल्ह्यातील दहा शाळांवर सायबर सुरक्षा याविषयी जनजागृती करण्यात येते.
नुतन माध्यमिक विद्यालय येथे सायबर वॉरियर्स रूपाली संजय माळी येणे नेटवर्क सुरक्षा, मोबाईल सुरक्षा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर अंकिता विजय महाजन येणे मोबाईल फोन,सोशल नेटवर्किंग वेबसाईट चा वापर येथील समस्या व उपायोजना तसेच मोबाईल ॲप्लिकेशन, आपल्या विविध पासवर्डची सुरक्षा कशी करावी, सोशल मीडिया सायबर गुन्हे यातून नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक कशी कशा पद्धतीने होते याविषयी मार्गदर्शन केले.
तसे शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी यांनी आपली खाजगी माहितीचा आणि छायाचित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून काही समाजकंटक पैसे कशा पद्धतीने उकळतात याविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेचे शिक्षक यांनी एस.पी.एंडाईत आय सुरक्षा विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी, शिक्षक,एस.पी.एंडाईत,ए.डी.
पाटील,बी.ए.माळी,एस.सी.महाजन,व्ही.डी.शिरसाठ,के.एल.ठाकरे,पी.सी.धनगर,जी.वाय.जगताप,व्ही.आर.माळी, डी.डी.सोनवणे,कुवर सर इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post