





माजी केंद्रीयपंचायत राज राज्यमंत्री श्री कपिल पाटील साहेब यांचे विधान परिषद मुरबाड दौरा चालू..
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री कपिल पाटील साहेब यांचे आज पासून विधान परिषद निवडणुक तोंडावर असताना मुरबाड विधान परिषदेत जनसंवाद दौरे चालू केले असून श्री कपिल पाटील साहेब यांनी आज कपिल पाटील साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालय मुरबाड येथे कार्यकर्त्यांना आठवड्यातून एक वार देण्याच्या अनुषंगाने आज पहिला संवाद दौरा मुरबाड येथे केला.
त्या अनुषंगाने अनेक शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते साहेबांची भेट घेण्यासाठी आले. साहेबांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला की मी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असेल आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मी एकटे पडून देणार नाही.
तुमच्या समस्या निराकरण करण्याचे काम मी नियमित करीत राहीन असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला असून तसेच मुरबाड तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टीवर संवाद केला कार्यकर्त्यांची एवढी गर्दी होती की साहेबांना चार तास कार्यकर्त्यांसाठी द्यावे लागले.
एकंदरीत असे पाहता असे दिसून येत आहे की कपिल पाटील साहेबांचा कडे अनेक कार्यकर्ते आपला हक्काचा नेता म्हणून अनेक कामे घेऊन येत आहेत आणि जाताना हसत हसत चेहऱ्याने कार्यालयातून जात आहेत..
Discussion about this post