एरंडोल नगरपरिषदेवर शासन स्तरावर शासकीय पथविक्रेता समितीवर जळगाव जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हा युवक अध्यक्ष व संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य मोठ्या प्रमाणात असलेले व सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री तुषारभाऊ सुभाषशेठ शिंपी यांची निवड झाल्याने आज त्यांचा एरंडोल निवासस्थानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .
यावेळी शिवाजीराव शिंपी उपाध्यक्ष अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था तसेच एरंडोल शहर शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री संजय इसई व जळगावचे ज्येष्ठ समाजसेवक शरदराव कापडणे प्रशांत कापुरे जितेंद्र कापडणे व अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीत आज रोजी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
Discussion about this post