उल्हासनगर महापालिकेत मोठा घोटाळा : डीपी रोडवरील बांधकाम परवानग्यांसाठी जबाबदार असलेल्या वास्तुविशारदांना काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी..!
उल्हासनगर महापालिकेत 2021 ते 2023 या कालावधीत डीपी रोडवरील बांधकाम परवानग्यांचा महापूर आल्याने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. नगररचना विभागाने कागदपत्रांची योग्य छाननी न करता या परवानग्या दिल्या असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान होत आहे.
या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे (ठाणे जिल्हा) अध्यक्ष अधिवक्ता स्वप्नील दिलीप पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून वास्तुविशारदांना काळ्या यादीत टाकावे, बांधकाम परवानग्या रद्द कराव्यात, सदनिकांची नोंदणी थांबवावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाला अनेक वर्षांपासून या विभागात कार्यरत असलेले नगररचना विभागाचे अभियंता श्री.संजय पवार हेही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. योग्य छाननी न करता डीपी रोडवरील बांधकाम परवानग्या देण्यासाठी त्याने बिल्डरांशी असलेले आपले कनेक्शन वापरले आहे.
याकडे शासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची मा
Discussion about this post