दि. १६ ऑगस्ट:शहापूर(आंबिवली) स्वातंत्र्यदिनानिमित्त काल १५ ऑगस्ट या दिवशी जिप.शाळा,आंबिवली येथे स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी धूमधामात पार पडला. शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अगदी सकाळी ८ वाजताच शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ध्वजारोहणाची सर्व तयारी केली. मुख्य अतिथी आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व सह शिक्षकांनी आलेल्या पाहूण्यांचे स्वागत केले.
ह्यावर्षी प्रथमच विद्यार्थीपालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांनी अनेक गाणी व भाषणे सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी अतिथींनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व देशासाठी आपण सदैव तयार राहिले पाहिजे असा संदेश दिला. शाळेतील शिक्षकांनी मुख्य अतिथींचे व इतर सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांना गोड- धोड व वृक्ष वाटून करण्यात आला.
तसेच शालेय आवारात वृक्षारोपण करुन करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थी पालक,ग्राम विस्तार अधिकारी श्री.ज्ञानेश्वर पावसे साहेब,ग्राम पंचायत सदस्य एकनाथजी कोर,विनायक धसाडे,नाथा डोंगरे व अंगणवाडी सेविका इ.उपस्थित होते
प्रतिनिधि:विजय गगे
९२०९५६३८६४
Discussion about this post