सारथी महाराष्ट्राचा/शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी वाल्मीक सूर्यवंशी. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाकली येथे १५ ऑगस्ट रोजी सरपंच वैष्णवी हनुमंत बालूरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत बाकली गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी नानासाहेब शिंदे ,तर उपाध्यक्षपदी शिवाजी सालीमे ,यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, तर सतीश शिंदे, दामोदर सालीमे, सोमनाथ घारोळे, पांडुरंग काकनाळे, गुणवंत शेळके, त्र्यंबक कांबळे, बिभीषण काकनाळे, स्वरूप हारगे, प्रभुनाना गजभार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच पंकज रक्साळे माजी उपसरपंच उमाकांत पाटील,हणमंत बालुरे,ग्रामसेवक बी . व्ही. मलवाड यांच्यासह गावातील अनेक नागरिक या ग्रामसभेस उपस्थित होते.

Discussion about this post