
भाऊसाहेब गुलाब रावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल,पाळधी येथे ‘ग्रीन डे’ आणि “फूड फीस्टा”साजरा.निसर्ग संवर्धन ही संकल्पना समोर ठेऊन ग्रीन डे साजरा करण्यात आला.या प्रसंगी सर्व विद्यार्थी ,शिक्षक ग्रीन कपडे परिधान करून आलेले होते. नर्सरी,ज्युनिअर , सिनियर KG च्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केलेल्या होत्या.

शाळेचे प्राचार्य नरेंद्र मांडगे सर यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाची शपथ दिली.त्या नंतर फूड फिस्टा साजरा झाला.ज्यात विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेल्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. या प्रसंगी GPS Campus मधील सर्व शिक्षक – शिक्षिका, आणि विद्यार्थ्यांनी विविध स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष मा.प्रतापदादा पाटील, मा. विक्रम दादा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तसेचसर्व शिक्षक,विद्यार्थी ,कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Discussion about this post