
: पांढरकवाडा : नीताताई आनंदराव मडावी (बोरेले),केंद्रीय क्रीड़ा मंत्रालय द्वारा संचालीत नेहरू युवा पुरस्कार प्राप्त आणि रजनीकांत बोरेले यांची पत्नी यांचा सत्कार पोहरदेवी येथे झाला आहे. सौ.अनामीका सुनीलजी महाराज यांच्या शुभ हस्ते साड़ी,चोळी,फुलांचा गुच्छा आणि श्रीफळ भेट देवून नीताताई मडावी.(बोरेले) यांना सन्मानित केले आहे. तद नंतर व्हिसल ब्लोअर,आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत डालूरामजी बोरेले यांचा सत्कार पोहरा देवी चे महंत व बंजारा समाजाचे धर्मगुरु सुनीलजी महाराज यांच्या शुभ हस्ते शाळ,श्रीफळ देवून करण्यात आले आहे.बंजारा समाजातील काशी म्हणून विश्व मध्ये ओळख असलेली कुलस्वामिनी आई जगदंबा पोहरादेवी आणि संत सेवालाला – संत बामणलाल महाराज यांच्या दर्शना करीता रजनीकांत डालूरामजी बोरेले आणि त्यांची पत्नी नीताताई मडावी (बोरेले) हया गेले असता बोरेले पति – पत्नी यांचे सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रां मध्ये अनेक वर्षा पासून केलेल्या दानधर्म आणि उत्कृष्ट केलेल्या कार्य बद्दल सौ,अनामीका आणि महंत धर्मगुरु सुनीलजी महाराज या दांपत्ती यांनी केले आहे. विशेष म्हणजे झालेल्या सत्कार बद्दल शंकर बडे माजी नगराध्यक्ष न.प. पांढरकवडा .उपाध्यक्ष जिल्हा कोंग्रेस कमिटी यवतमाळ.अध्यक्ष, जगदंबा देवस्थान केळापुर, यांनी रजनीकांत बोरेले, नीता बोरेले(मडावी) यांना शुभेच्छा दिले असून रजनीकांत बोरेले त्यांच्या प्रेमळ, रोकठोक आणि एक वचनी सभाव आणि केलेल्या पर उपकारी कार्य मुळे रजनीकांत बोरेले यांच्या वर प्रेम करणारा मोठा वर्ग असून त्यांचा नेट वर्क देशात अनेक ठिकाणी असल्याचे शुभेच्छा देत प्रतिक्रिया दिली आहे.
ता. प्र. गणेश बेतवार
Discussion about this post