
- पांढरकवडा : शहरातील शामनगरीमधिल रहवासी ४४ वर्षीय ईसमाने आपल्या घराच्या पोर्च मध्ये गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि.३१ रोजी दुपारी ३:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. गणेश सदाशिव भोस्कर असे आत्महत्या करणाऱ्या ईसमाचे नाव आहे. गणेश यांच्या घरी दुपारच्या वेळेस कोणीही नव्हते. त्यांनी घराच्या पोर्चमध्ये गळफास लावुन घेतला. हि बाब तेथील काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती पोलीसांनी दिली. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन तो उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला होता.
ता. प्र. गणेश बेतवार
Discussion about this post