साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची जागा राज्य सरकारने मंजूर केली आहे. अनेक वर्षां पासून प्रलंबित असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे तसा अधिकृत प्रस्ताव पाठविण्यात आला होता व त्यासाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरू होता.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी हा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला.
लोकशाहीर अण्णाभाऊंचे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण पुढील पिढ्यांना कायम होत रहावे, अशी आपली प्रामाणिक भावना आहे.
Discussion about this post