उदगीर ) : भारतीय नमो संग हे सामाजिक संघटन असून या संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री म्हणून उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या काबरा विजयालक्ष्मी उर्फ जया द्वारकादास यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय नमो संघाचे संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष मनोज कुमार मन्नू यांनी तशा आशयाचे नियुक्तीपत्र 31 ऑगस्ट रोजी जया काबरा यांना दिले आहे. पुढील दोन वर्षासाठी ही नियुक्ती असून जया काबरा या संघटनेचे उद्दिष्ट आणि ध्येय जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतील, आणि भारतीय नमो संघाला प्रतिष्ठा मिळवून देतील. अशी अपेक्षा या नियुक्ती पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन आपल्याला भारतीय नमो संघाच्या महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री पदावर नियुक्ती देऊन एका अर्थाने मोठा गौरव करण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे निश्चितच आपल्याला कार्य करायला बळ मिळाले असून, दुप्पट जोमाने आपण कार्य करून दाखवू. संघटन मजबुती करण्यासाठी आणि संघटन वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करू. असा विश्वासही जया काबरा यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
Discussion about this post