ता.प्रीतिनिधी – आज श्रावनातील शेवटचा दिवस आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे आज बैलपोलळ्याचे खूप महत्व आहे. तांत्रिक युगामुळे बैलाऐवजी शेतकरी आता शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर जास्त प्रमाणात करू लागले आहेत.
त्यातच यावर्षी जनावरांचे आजार तोंड वर काढू लागले आहेत. त्यामधीलच एक आजार म्हणजे लंपी आजार.आणि त्याचेच कारण समजून घेऊन जनावरांच्या लंपी आजारामुळे बैलांना आजार होऊ नये म्हणून यावर्षी खळेगाव नगरिमध्ये बैलपोळा दरवर्षीपेक्षा फार कमी भरला मात्र बैलांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस घटत चालली आहे. आणि यावर्षी खळेगाव नगरिमध्ये पोळ्याचे महत्व कमी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी गावात ट्रॅक्टरपोळा भरवला.
गावातील काळुंकादेवी मंदिरापासून सुरवात करून मधील विठ्ठलरुख्मिणी मंदिर,मारोती मंदिर, महादेव मंदिर, रस्त्यातील सर्व देवदेवतांचे दर्शन करून शेवटी भगवानबाबा चे मंदिराजवळ भगवानबाबा चे दर्शन करून ट्रॅक्टरपोळ्याची सांगता करण्यात आली.
Discussion about this post