नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक 3/9/2024 मंगळवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त नाशिक यांची भेट घेऊन विविध विषयाचे निवेदन देण्यात आले..

निवेदनाचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्य समाज कल्याण अंतर्गत 100% अनुदानित संस्था सी एस आर समाजकार्य व अध्ययन ह्या संस्थेने दलित समाजातील वसंत कांबळे ह्यांना समाज कल्याण ची पूर्व परवानगी न घेता सेवेतून निलंबन केले असून समाजकल्यांची परवानगी अत्यावश्यक असूनही निलंबन केल्याबाबत संस्थेवर कडक कारवाई करून प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी केली आहे..
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, नगर जिल्हाध्यक्ष मनाजी कांबळे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) सरचिटणीस वसंत कांबळे, युवा नेते सुशांत हिवाळे,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!
Discussion about this post