श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या उपस्थितीत नागेपल्ली येथे बैल पोळा उत्सव साजरा..! !
आलापल्ली – नागेपल्ली येथील सर्व शेतकरी बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित….
– बैल पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा सण. ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
नागेपल्ली हनुमान मंदीर येथे भव्य असा बैल पोळा उत्सव साजरा करण्यात आला. गावातील सर्व नंदी बैल सजवून त्यांची वाजत-गाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या व बैल जोडी ची पुजा अर्चना करण्यात आली.
व राजे अम्ब्रीशराव महाराज तर्फे उत्कृष्ट अस सजवलेल्या बैल जोडीना प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस देण्यात आले. व तसेच सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना प्रोत्साहानव पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमात नागेपल्ली येथील प्रतीष्ठीत नागरीक भाजप पदाधिकारी ,सर्व व्यापारी वर्ग व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी हनुमान मंदीर कमेटी चे सदस्य व नागेपल्ली तील युवा वर्ग परिश्रम कले.
Discussion about this post