-प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत महागणपती भाद्रपद गणेशोत्सव पारंपारिक व धार्मिक यात्रेस आज पहाटे तीन वाजता अभिषेक व पूजा करून मुक्तद्वार दर्शनाचा प्रारंभ झाला . भक्तांना मूर्तीस स्पर्श करून दर्शन घेता येते
.मंदिर परिसर व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट विद्युत रोषणाई ,पार्किंग व्यवस्था , विशेष हिरकणी कक्ष भक्तांसाठी दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे
असे देवस्थान अध्यक्षा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या उत्सवास भरगच्च असे धार्मिक ,सामाजिक , कार्यक्रम होत असतात त्यासाठी देवस्थान विश्वस्तानी जय्यत तयारी केली आहे आज सकाळी दहा वाजता पालखीचे पूर्वद्वार प्रस्थान कर्डे येथील ( दोनलाई देवी)मंदिराकडे झाले पहिल्या दिवशी पालखीचा मान पाचुंदकर आळी यांच्याकडे असतो
पोलीस प्रशासन, देवस्थान कर्मचारी , विभाग आरोग्य , ग्रामपंचायत इ .यात्रेसाठी सज्ज असून पहाटे तीन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले
त्यावेळी देवस्थान अध्यक्षा सौ .स्वातीताई पाचुंदकर पाटील मुख्य विश्वस्त डॉ .ओमकार देव उपाध्यक्ष संदीप दौंडकर सचिव तुषार पाचुंदकर पाटील खजिनदार विजय देव व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हेपुजारी प्रसाद कुलकर्णी मंदार कुलकर्णी पोलीस प्रशासनाचे श्री प्रशांत डोलेपोलीस उपाधीक्षक शिरूर विभाग श्री वाघमोडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंडित मांजरे पोलीस उपनिरीक्षक इ .उपस्थित होते.
Discussion about this post