:- जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात पक्षात नवा उत्साह :- ( समीर बल्की तालुका प्रतिनिधी ) :- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष जावेद शेख यांनी जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात प्रवेश केला. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उबाठा) गट नेहमी तत्पर आहे. जिवतोडे यांच्या प्रखर कार्यशैलीला पसंती देत जावेद शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश केला.
या वेळी शेख यांच्या सोबत अमीर पठाण, अफसर शेख, मोहित गुप्ता, आवेश बाहे, अमोल भोयर, रियाझ सय्यद, आणि मोहसीन शेख यांनीही पक्ष प्रवेश केला. या सोहळ्यात उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, युवासेना जिल्हा समन्वयक आणि माजी नगरसेवक दिनेश यादव, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, तालुका प्रमुख विपीन काकडे, शहर प्रमुख संदीप मेश्राम, शहर संघटक किशोर टिपले, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post