मेंढा शाळेत तान्हा पोळा उत्साहात संपन्न
लाखांदूर:-सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मा. माणिकराव खरकाटे यांचे अध्यक्षतेखाली जि. प. प्राथ. शाळा मेंढा येथे तान्हा पोळा भरविण्यात आला. लहान मुलांना आनंद देणारा हा क्षण थोरा- मोठ्यांनी उत्साहाने अनुभवला. एक-एक करुन चक्क साठ लहानग्यांनी आपला नंदीबैल शाळेत घेऊन आले.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक नंदीबैलाची विधीवत पूजन व अक्षता लावून पाया पडण्याची प्रथा जोपासण्यात आली. बालकांना चाॅकलेट, पेन आणि रजिष्टर वाटप करण्यात आले. यावेळी प्रत्येकास २१ रुपये व ईश्वरचिठ्ठीने पाच क्रमांक प्राप्त बालकास शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खरकाटे, उपाध्यक्षा ज्योती टापरे, ग्रा. पं. सदस्य ईश्वर खरकाटे, भुमेश्वर मिसार, शंकर टापरे, होमराज चौधरी, सुधाकर लांडगे, संजय खरकाटे, डाॅ. नरेंद्र वझाडे, पुरुषोत्तम बगमारे, नमिता पेंदाम, सरीता मेश्राम, कुसूम शहारे, कांचन दिघोरे, संगीता खरकाटे, गुरुदेव टापरे, संदीप भर्रे यांचेसह अनेक ग्रामवासी उपस्थित होते.
समारोपीय भाषनानंतर आरती करून मुलांना प्रसाद वाटप करण्यात आले. शाळेत पहिल्यांदाच तान्हा पोळ्याचे आयोजन केल्याने ग्रामवासियांची गर्दी वाढलेली पाहावयास मिळाली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गणेश कुंभारे सर,विनोद ढोरे सर,सुषमा दिघोरे, अनिता मिसार, देवराम दिघोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
खुशाल डोंगरवार प्रतिनिधी
७५८८७८९९७५
९१५८५७३१८०
Discussion about this post