उदगीर /कमलाकर मुळे: येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ.एस.एन. हल्लाळे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचा 32 वर्षांचा अनुभव असून त्यांनी अध्यापन क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रा. डॉक्टर बी. एस. होकरणे यांचा जिल्हास्तरीय युवक युवती शिबिर आयोजनाबद्दल प्राध्यापक डॉक्टर आर.पी. साबदे यांचा राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांची पोलीस आणि मिलिटरी मध्ये निवड झाल्याबद्दल प्राध्यापक डॉ. दीपक चिद्दरवार यांचा अक्षरमुद्रा दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल क्रीडा संचालक सतीश मुंडे यांना क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्राध्यापक डॉ. जी .जी. जेवळीकर यांनी व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल स्वागत करण्यात आले. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके ,सहसचिव ॲड. एस.टी. पाटील चिघळीकर, आणि डॉ. रामप्रसाद लखोटिया कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर ,संस्था सदस्य बसवराज पाटील नागराळकर,प्रा.मनोहरराव पटवारी,बसवराज पाटील मलकापूरकर, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के ,प्रा.मुडपे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Discussion about this post