(भारत देवरे मो 8888209933)
धुळे,जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनीसाठी क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कुटा) आणि क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण विद्या प्रतिभा ही योजना राबवली जात आहे यात गुणवंत विद्यार्थिनी साठी धुळे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनीचा कौतुक सोहळा सादर करण्यात आला,
जिल्हा पोलीस अधिक्षक माननीय श्री श्रीकांत यशवंत धीवरे सर यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक कार्यालय धुळे येथे संपन्न झाला . कुमारी साक्षी पाटील. भाग्यश्री नांद्रे . मयुरी गवळी. अपेक्षा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येकी पंधरा हजार शिष्यवृत्ती तसेच प्रमाणपत्र या सर्व चार शालेय गुणवंत विद्यार्थिनींना देण्यात आले यावेळेस धुळे विभागाचे विभागीय अधिकारी श्री सचिन घाटगे सर . धुळे क्षेत्राचे क्षत्रिय अधिकारी माननीय श्री प्रकाश खराटे सर आणि संजय द्वासे सर आणि शाखा अधिकारी हिरालाल रत्नपारखी , राहुल ब्राह्मणे सर क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड चे सर्व पदाधिकारी व विद्यार्थिनीचे पालक उपस्थित होते .
Discussion about this post