दौंड तालुका प्रतिनिधी- ता.4 श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरातील वन उद्यानाचा कायापालट करण्यासाठी आमदार राहुल दादा कुल यांच्या प्रयत्नातून 2 कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
आमदार राहुल दादा कुल यांची वनमंत्रांना भेट
दौंड व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर असलेले यादवकालीन मंदिर श्री क्षेत्र भुलेश्वर येथील वन उद्याण्याचा विकास व्हावा या दृष्टीने दौंड चे आमदार राहुल दादा कुल यांनी वनमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांची भेट घेतली व वनमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांना निवेदन देण्यात आले
आदेश
असून त्याबाबत वनविभागाचे प्रधान सचिव श्री वेणू गोपाल रेड्डी साहेब यांना बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार बैठक आयोजित करण्यात आली .
पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न
श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसर वन विभागाचे भरपूर जागा असून येथे पर्यटन स्थळाला चालना देण्याच्या उद्देशाने भाविक -भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्या या दृष्टीने उद्यानाचा विकास करण्यासाठी 2 कोटीचा निधी ची आमदार राहुल दादा कुल यांनी मागणी केली आहे.
यावेळी प्रधान सचिव श्री वेणू गोपाल रेड्डी साहेब यांनी दोन कोटीच्या कामाचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत या बैठकीला मुख्य वन संरक्षक पुणे श्री एन आर प्रवीण ,उपवन संरक्षक पुणे श्री महादेव मोहिते, उपसचिव श्री विवेक होशिंग इत्यादी उपस्थित होते.
Discussion about this post