शंकरराव ढगे 9890964982
अर्धापूर,प्रतिनिधी
तालुक्यात तिन दिवसात अतिवृष्टी झाल्याने केळी,हाळद,सोयाबिन पीकांचे अतोनात नुकसान झाले,यामुळे संभाजीनगरहुन महसुल आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पार्डी (म),शेलगाव (बु),(खु) येथे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त पीकांची पाहणी केली, अधिकाऱ्यांना यावेळी शेतकरी व गावकर्यांनी व्यथा सांगीतल्या तेव्हा वरिष्ठ अधिकारीही हळहळले,शेतकर्यांनी ७२ तासात नुकसानीची तक्रार करण्याचा मुदा हा त्रासदायक असल्यामुळे खरा नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहत असल्याचे सांगितले, नुकसानग्रस्त सर्व शेतकर्यांना शासनाकडून सरसकट आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकर्यांनी केली.
नांदेड जिल्ह्यासह अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने बागायती पीकासह सोयाबिन पीकांचे नुकसान झाले.मंळगवारी तालुक्यात खा. अशोकराव चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बुधवारी महसुल आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधीकारी अभिजीत राऊत यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव(म), शेलगाव,पार्डी (म) येथे पाहणी केली. यावेळी पार्डी (म) नदीला व नागझरी नाल्याला पूर आल्याने लगदची जमीन खरडून गेली,नागझरी नाल्यावर पुलाची आवश्यकता आहे,शेतकरी पत्रे यांच्या पीक असलेल्या शेतात नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.७२ तासात नुकसानग्रस्त शेतकर्यांनी तक्रार करावी हा मुदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थीतांनी पटवून दिले. या मुद्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घेतली.
यावेळी जिल्हाधीकारी अभीजीत राऊत,प्रशिक्षणार्थी जिल्हाधीकारी अनुष्का शर्मा,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर,विभागीय अधिकारी सचीन खल्लाळ,तहसीलदार रेणुकादास देऊणीकर,गटविकास अधिकारी दतात्रय कदम,निवासी नायब तहसीलदार शिवाजीराव जोगदंड,कृषी अधिकारी सुनिल देवकांबळे,कृऊबाचे संचालक व सरपंच निळकंठराव मदने,डॅा श्रीकांत देशाई,मंडळ अधिकारी नविन रेड्डी लकडवार,महेश वाकडे,विस्तार अधिकारी विश्वनाथ मुंडकर,डॅा.एस.पी. गोखले,सुनिल गोखले,देविदास कांबळे,ग्रामसेवक शिवकुमार देशमुख,बालाजी वसमतकर,गजेवाड,तलाठी प्रदीप ऊबाळे, लक्ष्मण द्शमुख,लक्ष्मीकांत मुळे,गुणवंत विरकर,मारोतराव देशमुख,राजकुमार मदने,किरन भांगे,प्रसाद हापगुंडे,बाबूराव हापगुंडे,बाळू हाके,इनुस नदाफ,दामोदर हापगुंडे,अशोक मदने,दिलीप हापगुंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची उपस्थीती होती.
Discussion about this post