व्याख्याते डॉ कळमकर दिग्दर्शक कांबीकर व तसेच प्रतिष्ठानचे कार्य दयक्ष माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. गेवराई तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुरूजनांना पंधरा वर्षापासून शारदा प्रतिष्ठान शिक्षक दिनाचे औचित्य साधुन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते .
गेवराई विधानसभा मतदारसंघातील गुणीगुरूजनांचा गौरव व्हावा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याचे शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शारदा प्रतिष्ठान च्या वतीने गेले पंधरा वर्षे पुरस्काराचे वितरण केले जाते. पुरस्कार मिळालेले शिक्षक भारत काकडे सर आता जिल्हा परिषद शाळा मौजे आम्ला ता. गेवराई जिल्हा बिड येथे कार्यरत आहेत.
Discussion about this post