शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळाच्या घटनेचा निषेधार्थ वडगाव बुद्रुक येथील महालक्ष्मी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला आणि पूजन करण्यात आले.
राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले, योगेश पवार, विभाग प्रमुख मनीष जगदाळे, केतन शिंदे,महादेव येनपुरे, राजू चव्हाण, नाना मरगळे, प्रदिप दोडके, अक्षय सावंत, सिद्धार्थ पिसाळ,राजेंद्र वाघ तसेच महिला आघाडीच्या सुनीता खंडाळकर,रेखा कोंडे, राज्य विस्तारक युवती सेना मृण्मयी लिमये,साक्षी लाड धनश्री शिंदे हे पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन उपविभाग प्रमुख केतन शिंदे आणि युवती सेनेच्या धनश्री शिंदे यांनी केले.
Discussion about this post