स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही लोकांना नदीतून जाण्यासाठी करावी लागते जीवघेणी कसरत
नदीतच आमदार खासदारांचा निषेध करत बुधवार दि 11 सप्टेंबर रोजी करणार ग्रामस्थांच्या सोबत जलसमाधी आंदोलन
. प्रा किसन चव्हाण
शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे तीनशे ते साडे तीनशे लोकसंख्या आलेली कुरण वस्ती (दलित ) आहे या वस्तीकडे जातांना नदी लागते परंतु स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर ही तिथे पूल बांधला नसल्याने वस्तीवरील ग्रामस्थ, शाळेतील मुलं ,महिला तसेच आजारी पेशन्ट यांना जीवघेणी कसरत करावी लागते नदीला पाणी आले तर वाघोली गावाचा संपर्कच तुटतो पाणी कमी होई पर्यंत मुलांना शाळेत जाता येत नाही तेथील ग्रामस्थांनी अनेकदा लेखी निवेदन देऊनही आमदार खासदार यांनी निधी दिलेला नाही कुरण वस्ती वरील लोकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे .
त्यामुळे आज तेथील ग्रामस्थांच्या आग्रहामुळे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रा किसन चव्हाण यांनी वस्तीला भेट दिली, जातांना प्रा किसन चव्हाण त्यांनाही नदीतून उड्या मारून जावे लागले त्यामुळे संबंधित नदीवरील पुलाचे काम तातडीने व्हावे यासाठी आमदार खासदार यांनी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी बुधवार दि 11 सप्टेंबर 2024 रोजी त्या नदीतच ग्रामस्थांच्या विध्यार्थ्यांच्या सह वंचित चे कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रा किसन चव्हाण यांनी दिला आहे .
यावेळी कुराणवस्ती वर घोंगडी बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये दलित वस्तीतील रस्ते सुविधा अनेक प्प्रश्नावर चर्चा झाली या बैठकीला वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख लक्ष्मण मोरे ग्रामपंचायत सदस्य दगडू बोरुडे, गणेश शिरसाठ ,बाळासाहेब काळपुंड अजिनाथ शिंदे सुंदर आल्हाट, सत्यदान आल्हाट ,देविदास (पप्पू )आल्हाट, अमोल आल्हाट ,दादासाहेब आल्हाट, बापू दौलत आल्हाट सुनील आल्हाट संदीप आल्हाट देविदास आल्हाट, कार्लास आल्हाट ,सुनील वीजय आल्हाट भगवान आल्हाट, किशोर आल्हाट ,भागीनाथ आल्हाट ,देवा वाघमारे, सुधाकर आल्हाट ,सिंधुताई आल्हाट मोनिकाताई आल्हाट सुनीता आल्हाट मीराबाई आल्हाट लताबाई आल्हाट यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Discussion about this post