
आर्णी :-
राष्ट्रीय बंजारा सेना संघटनेत एक महत्त्वाचा बदल घडला आहे, ज्यामध्ये मा. चंचल ज्ञानेश्वर पवार यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचा जल्लोष महासभेच्या सदस्यांमध्ये दिसून आला. राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार गुलाबराव राठोड यांनी निवड प्रमाणपत्र देऊन मां. श्री. मुरली भाऊ राठोड यवतमाळ जिल्हा मीडिया अध्यक्ष मां. चंचल पवार यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून निवड केली. लवकरच चांदीचा कडा देऊन भव्य सत्कार करण्यात येईल मां.चंचल पवार यांच्या नेतृत्वाखाली महासभेचे कार्य अधिक दृढ आणि प्रभावी होईल,असा विश्वास सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या कामकाजातील उत्साह आणि समाजातील विविध समस्यांवर त्यांचे नेत्रत्व असलेले कार्य, महासभेच्या उद्दिष्टांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.चंचल
पवार यांची निवड म्हणजे एक नवीन पर्वाची सुरूवात आहे, ज्या अंतर्गत राष्ट्रीय बंजारा सेना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी आणि सकारात्मक दिशा मिळेल. त्यांच्या नेतृत्वाखाली महासभेच्या कार्यक्षेत्रात नवे अध्याय लिहले जातील,अशी आशा व्यक्त होत आहे..
Discussion about this post