अतिवृष्टीग्रस्त भागाची सखोल पाहणी
आज दिनांक 08/09/2024 रोजी राजेश भैय्या टोपे यांनी अतिवृष्टीने प्रभावित गावांचा पाहनि दौरा केला. गोरि गांधारी, डोमलगाव, पिंपळगाव, आपेगाव, बळेगाव या भागांचा त्यांनी सखोल मागोवा घेतला.
शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा
राजेश भैय्या टोपे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीला जाऊन बांधावर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक शेतकरी, सरपंच, उपसरपंच, तलाठी, व ग्रामसेवक उपस्थित होते.
शासनाकडून तातडीने मदतीचे आश्वासन
पाहनि दौऱ्यादरम्यान राजेश भैय्या टोपे यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या अडचणींना त्वरित मार्ग शोधून दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.
हा दौरा करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना लागेल ती मदत मिळवून देणे हे आहे. त्यामुळेच शेतकरी वर्गातून या दौऱ्याचे स्वागत करण्यात येत आहे.
Discussion about this post