तालुका प्रतिनिधी.मनीषा नवले
राहू येथे कैलास विद्या मंदिर शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा
राहू .
आज राहू येथील कैलास शिक्षण मंडळाचे कैलास विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज राहू येथे दुपारच्या सत्रात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात पाच सप्टेंबर शिक्षक दिन विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
अनेक सहकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली याप्रसंगी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री जगदाळे सर ज्येष्ठ सहकारी काळे सर यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post