कोल्हापूर/
संविधान सन्मान प्रतिष्ठानच्या युवकां वरील गुन्हे मागे घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनसो मुश्रीफ साहेब यांचेकडे आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना जनांदोलन च्या वतीने पाठपुरावा! प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी अखंड जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनता एकवटणार! ….. आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना जनांदोलनाचे निमंत्रक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी व्यक्त केला विश्वास!
*संविधान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत! ….. प्रा. शहाजी कांबळे*
*संविधान सन्मान प्रतिष्ठानच्या युवकां वरील गुन्हे मागे घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनसो मुश्रीफ साहेब यांचेकडे आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना जनांदोलन च्या वतीने पाठपुरावा! प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी अखंड जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनता एकवटणार! ….. आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना जनांदोलनाचे निमंत्रक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी व्यक्त केला विश्वास!*
संपूर्ण राज्याला आणि देशाला प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक बिंदू चौकामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा बाबासाहेबांच्या हयातीतील जगातला पहिला पुतळा आहे. म्हणून बिंदू चौक हा देशातील तमाम आंबेडकरवादी आणि बहुजनांचे ऊर्जा स्थळ आहे. त्याचे विद्रूपीकरण होऊन नये म्हणून संविधान युवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्रूपीकरण थांबवण्यासाठी आंदोलन करून मागणी केली.
मूळ मागणीला बगल देऊन महानगरपालिका आयुक्तांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत, ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. यासाठी आम्ही आंबेडकरवादी समाज, पक्ष, संघटना जनांदोलनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांचा जाहीर निषेध करतो. आणि कोल्हापूर महानगरपालिका आम सभेने पारित केलेला ठराव, धार्मिक दबावाला बळी पडून राबवू न शकणाऱ्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना तात्काळ पदमुक्त करावे आणि संविधान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यां वरील गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा आंबेडकरी समाजाचा उद्रेक होईल असा इशारा प्रा. शहाजी कांबळे यांनी आज दिला आहे.
संविधान युवा प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष ऐतिहासिक बिंदू चौकाचे सुशोभीकरण व्हावे आणि विद्रूपीकरण थांबावे यासाठी प्रयत्न करत आहेत. महानगरपालिकेने सन 2013 च्या आमसभेत बिंदू चौक येथे राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्याचा ठराव पारित केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी संविधान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संविधानिक आणि कायदेशीर आंदोलन करून पाठपुरावा केला आहे.
पोलीस प्रशासनाने बिंदू चौकात बेकायदेशीर रित्या मंडप उभारून केलेल्या विद्रूपीकरणा बाबत संबंधितांवर गुन्हा नोंद करावा असे लेखी आदेश असताना, महानगरपालिकेने आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले आहेत. म्हणून महानगरपालिकेच्या ठरावाची अंमलबजावणी केवळ राजकीय आणि धार्मिक दबावाला बळी पडून आयुक्त के. मंजूलक्ष्मी करत नाहीत, म्हणून त्यांनी कोल्हापूर आयुक्त पदावरून दूर व्हावे तसेच संविधान युवा प्रतिष्ठानच्या आंदोलकांनी संविधानिक आणि कायदेशीर रित्या आंदोलन केल्याने त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे कृत्य आंबेडकरी चळवळ दडपण्याची कृती आहे त्यामुळे कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासकांनी तातडीने मागे घ्यावेत. अशी मागणी आज आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना जनांदोलनाच्या वतीने शासन-प्रशानाच्या विविध स्तरांवर करण्यात आली.
आंदोलन काळात मूळ मागणी पासून लक्ष हटवण्यासाठी दाखल झालेले गुन्हे पाहता चोर सोडून संन्यासाला फाशी आहे. कारण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा जपणारे आहेत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकरवादी समाज भक्कमपणे उभा राहणार आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने आंबेडकरवादी समाज आणि बहुजनांमध्ये वाद लावून राजकीय पोळी भाजून घेण्याचा राजकारण्यांनी प्रयत्न केल्यास त्याचे उत्तर निवडणुकांमध्ये जशास तसे दिले जाईल असा इशाराही आज देण्यात आला.
आंदोलनाची सुरवात जिल्हाधिकारी कार्यालया पासून करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांचेकडे आपली मागणी स्पष्ट करून त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय पोलीस प्रमुख श्री. तानाजी सावंत यांच्याशी पोलीस मुख्यालय येथे भेटून चर्चा केली. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेटून प्रा. शहाजी कांबळे यांनी शिष्टमंडळाच्या वतीने आंदोलनाची संपूर्ण माहिती दिली व आंदोलकांना साडेतीन तास महानगरपालिकेच्या चेंबरमध्ये ताटकळत ठेवून, त्यांची विचारपूस न करता आयुक्त के. मंजूलक्ष्मी या आंदोलकांना बेदखल करत कार्यालयातून बाहेर जाण्यासाठी निघाल्या. यावेळी आंदोलकांनी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन चालू ठेवले. आंदोलक हे गुन्हेगार नाहीत त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलकावरच गुन्हे दाखल केल्याने हा पेच उभा राहिलेला आहे, याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांचे लक्ष वेधले.
कार्यकर्त्यांना अटक न करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आश्वासना नंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मा. पवार यांचेशी सविस्तर चर्चा करून संविधान युवा प्रतिष्ठानच्या आंदोलकांना दिलासा मिळवून दिला.
या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रा. शहाजी कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे प्रभारी नंदकुमार गोंधळी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे, मातंग सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टि व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विद्याधर कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव, पी आर पी चे ज्येष्ठ नेते सुरेश सावर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी चे जिल्हाध्यक्ष विश्वास तरटे, शहराध्यक्ष प्रताप बाबर, शहर संघटक अमर तांदळे, भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळे, रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष प्रवीण आजरेकर, जिल्हा संघटक बटू भामटेकर, बाबासाहेब धनगर, युवा विचारवंत राजवैभव शोभारामचंद्र, बहुजन सेनेचे दादासाहेब माने, यशवंत को-ऑपरेटिव्ह चेअरमन श्रीमंत कांबळे, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे निमंत्रक निलेश बनसोडे, रोहन वाघमारे, शिवराम बुध्याळकर, पंकज आठवले आदी आंदोलक सहभागी होते.
Discussion about this post