सातारा
पाटण तालुक्यातील कुसवडे गावात गौराईचे आगमन मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले. संस्कृती जपत पारंपारिक पद्धतीने फ़ुगडी झिम्मा खेळत दिवसभर गौरी आवाहन केले. महाराष्ट्राभर सर्वत्र ठिकाणी गणपती आगमन झाले तसेच महिलांना आतुरता आसते ती म्हणजे गौरी आगमनाची. गणपतीनंतर भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचं व्रत म्हणजे ज्येष्ठागौरी व्रत किंवा गौरी पूजन. महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावाने गौरीचे पूजन केले जाते.
गणपतीसोबत गौरीचे पूजन तर होतेच शिवाय काही घरात फक्त गौरी पूजन केले जाते. जसे आपण ‘गौरी आली’ असे म्हणतो, काही ठिकाणी ‘महालक्ष्मी’ असेही म्हणतात. गौरी आली गौरी आली ! कशाच्या पावलांनी आली? असे म्हणताना तुम्ही नक्की ऐकलं असेल. गौरी आगमानाच्या वेळी असे म्हटले जाते. अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मी, ज्येष्ठा-कनिष्ठा असे म्हणतात.
प्रांतानुसार गौरीचे विविध प्रकार आपल्याकडे पहायला मिळतात. त्या.गौरीचे आगमन ज्येष्ठा नक्षत्रावर होते म्हणून तिला ‘ज्येष्ठा गौरी’ म्हणतात असे सांगितले जाते. तसेच गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला तसेच पृथ्वीवरील प्रत्येकाल तसेच गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला तसेच पृथ्वीवरील प्रत्येकाला सुखी केले.
गौरी गणपती कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले, म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया गौरीची पूजा करू लागल्या असे ही म्हणतात.लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी सायंकाळी सर्वत्र ठिकाणी घराघरांमध्ये गौराईचे आगमन झाले. यावेळी खेडे गावातील महिला मुली यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीक प्रकारे पेहराव केल्याच दिसून येते. सुवासिनींनी पारंपरिक गीते गात त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली.
गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरींचे. मंगळवारी ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे घरोघरी आगमन झाले. प्रत्येक कुटुंबाने आपापल्या चालिरीती, प्रथेनुसार गौराईचे स्वागत केले. काहींच्या घरी गौरींची मूर्ती अगदी ५ ते १० इंचापासून ते दोन ते तीन फुटांपर्यंत आहे. तर काही ठिकाणी गौरीचे संपूर्ण पुतळे सजविण्यात आले आहेत.
महाप्रसादाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर रात्रभर जागर केला जात आहेमहिलांनी शालू, पैठणी नेसवून गौरीला सजवले असून, सोन्याचे दागदागिने घालून शृंगार केल्याचे पाहायला मिळत आहे. गौरीच्या आगमनानंतर तिला , तर , तर काहीदागदागिने घालून शृंगार केल्याचे पाहायला मिळत आहे. गौरीच्या आगमनानंतर तिला भाजी-भाकरीचा, तर काही ठिकाणी गोड नैवेद्य दाखविण्यात आला. बुधवारी गौरपूजन आणि महाप्रसादाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर रात्रभर गौराईचा जागर केला जात आहे.
Discussion about this post